हार्दिककडे रोहित शर्माचा सर्वाधिक कॅच घेण्याचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची संधी

31 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

टी 20 आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होत आहे. या स्पर्धेत भारतासाठी सर्वाधिक कॅच घेण्याचा रोहितचा रेकॉर्ड ब्रेक होऊ शकतो.

भारतासाठी टी 20i क्रिकेटमध्ये सर्वाधिक 65 कॅच घेण्याचा विक्रम हा रोहित शर्मा याच्या नावावर आहे. मात्र रोहित टी 20i क्रिकेटमधून निवृत्त झाला आहे.

रोहितनंतर हार्दिक पंड्या आणि विराट कोहली या दोघांनी प्रत्येकी 54-54 कॅचेस घेतल्या आहेत.

टीम इंडियाचा विद्यमान टी 20 कॅप्टन सूर्यकुमार यादव याने 50 कॅचेस घेतल्या आहेत.

सूर्यकुमारला आशिया कप स्पर्धेत रोहितचा रेकॉर्ड ब्रेक करण्याची फार संधी नाही. मात्र हार्दिक रोहितला मागे टाकू शकतो.

रोहितला मागे टाकण्यासाठी सूर्याला 16 कॅचेस घ्याव्या लागतील. मात्र रोहितला पछाडण्यासाठी हार्दिकला फक्त 12 कॅचेसची गरज आहे.

टीम इंडिया या स्पर्धेत फायनलपर्यंत पोहचली आणि हार्दिकला नशिबाची साथ मिळाली तर तो रोहितचा हा विक्रम आपल्या नावावर करु शकतो.  

आशिया कप पॉवरप्लेमध्ये सर्वाधिक निर्धाव चेंडू टाकणारे गोलंदाज