हातात बकऱ्याचं शिर...! हार्दिक पांड्याने का शेअर केला असा फोटो?
25 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
हार्दिक पांड्या सध्या कसोटी संघात नाही. त्यामुळे तो काय करत आहे? कुठे आहे? याची चर्चा सोशल मीडियावर रंगली आहे.
हार्दिक पांड्याने इंस्टास्टोरीवर एक फोटो शेअर केला आहे. हा फोटो पाहून अनेकांना धक्का बसला आहे.
या फोटोत बकऱ्याचं शिर दिसत आहे. तसेच ते हातात पडून कोणीतरी उभा आहे.
बकऱ्याचं शिर असलेल्या या फोटोत कोणाचे हात आहेत, हे गुलदस्त्यात आहे. त्यामुळे काही सांगता येणार नाही.
हार्दिक पांड्याने या फोटोसोबत एक हिंट दिली आहे. त्या फोटोच्या कोपऱ्यात #SHOOT असं लिहिलं आहे.
हार्दिकने आपल्या मुलासोबतचा एक फोटो शेअर केला होता. सध्या तो मुलासोबत वेळ घालवत असल्याचं दिसत आहे.
घटस्फोटानंतर हार्दिक पांड्या पहिल्यांदाच आपल्या मुलासोबत वेळ घालवताना दिसला आहे.