फक्त 15 सामने खेळलेल्या खेळाडूकडे वनडे संघाची धुरा
15 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
ऑस्ट्रेलियाचा संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर आहे. दोन्ही संघात पाच वनडे सामन्यांची मालिका खेळली जाणार आहे.
इंग्लंडचा कर्णधार जोस बटलर दुखापतीमुळे वनडे मालिकेतून आऊट झाला आहे. त्यामुळे इंग्लंडने नव्या कर्णधाराची घोषणा केली आहे.
पाच सामन्यांच्या वनडे मालिकेसाठी हॅरी ब्रूकला कर्णधारपद सोपवलं आहे. 25 वर्षीय हॅरी ब्रूकला पहिल्यांदा इतकी मोठी संधी मिळाली आहे.
हॅरी ब्रूककडे फक्त 15 वनडे सामन्यांचा अनुभव आहे. संघात दिग्गज खेळाडू असूनही निवड समितीने त्याच्याकडे जबाबदारी सोपवली आहे.
हॅरी ब्रूकने 15 वनडे सामन्यात 29.07 च्या सरासरीने 407 धावा केल्या आहेत. यात 3 अर्धशतकांचा समावेश आहे.
हॅरी ब्रूक इंग्लंडसाठी 18 कसोटी, 39 टी20 सामने खेळला आहे. कसोटीत 1558 धावा, तर टी20 तर 707 धावा केल्या आहेत.
वनडे मालिका 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. शेवटचा वनडे सामना 29 सप्टेंबरला होणार आहे.