बांगलादेशने कधी भारताविरुद्ध कसोटीत विजय मिळवला आहे का? जाणून घ्या हेड टू हेड आकडेवारी
14 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
भारत आणि बांगलादेश यांच्यातील दोन कसोटी सामन्यांची मालिका 19 सप्टेंबरपासून सुरू होत आहे.
पहिला सामना 19 सप्टेंबरपासून चेन्नईत, तर दुसरा सामना कानपूरमध्ये खेळवला जाणार आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या दृष्टिकोनातून ही मालिका खूप महत्त्वाची असेल.
भारत आणि बांगलादेश यांच्यात आजपर्यंत एकूण 8 कसोटी मालिका खेळल्या गेल्या आहेत.
एक मालिका वगळता प्रत्येक वेळी टीम इंडियाने विजय मिळवला आहे. ती मालिका अनिर्णित राहिली.
दोन्ही संघांमध्ये 13 कसोटी सामने झाले असून 11 वेळा भारताने विजय मिळवला. तर 2 सामने अनिर्णित राहिले आहेत.
भारत आणि बांगलादेश यांच्यातील शेवटची कसोटी मालिका 2022 मध्ये खेळली गेली होती.