बीसीसीआयला होणार कोटींचं नुकसान! कारण काय?
15 July 2024
Created By: Sanjay Patil
बीसीसीआयला कोटींचं नुकसान होण्याची शक्यता, आरोग्य मंत्रालयाच्या निर्णयामुळे फटका बसण्याची शक्यता
सूत्रांनुसार, आरोग्य मंत्रालय क्रिकेट सामन्यांदरम्यान तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहीरातीवर कठोर निर्णय घेण्याच्या तयारीत
सरकारकडून बीसीसीआयला सामन्यांदरम्यान तंबाखूजन्य पदार्थांची जाहीरात न करण्याचे आदेश मिळण्याची शक्यता
आरोग्य मंत्रालयाने निर्णय घेतल्यास बीसीसीआयला आर्थिक नुकसान होणार हे निश्चित
बीसीसीआयची तंबाखूजन्य पदार्थांच्या माध्यमातून रग्गड कमाई
आयपीएल-इतर स्पर्धांमध्येही मैदानात तंबाखू आणि इतर पदार्थांची जाहीरात केली जाते, अभिनेत्यांकडूनही प्रचार
आता आरोग्य मंत्रालयाने निर्णय घेतल्यास बीसीसीआयला मोठ्या कमाईला मुकावं लागेल