IPL मध्ये 17 वर्षांनंतर असं चित्र पाहायला मिळणार
17 फेब्रुवारी 2025
बीसीसीआयकडून रविवारी 16 फेब्रुवारीला आयपीएलच्या 18 व्या मोसमाचं वेळापत्रक जाहीर
आयपीएल 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात, तर 25 मे रोजी अंतिम सामना
या 18 व्या हंगामातील सलामीच्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने
उभयसंघातील सामना कोलकातामधील इडन गार्डनमध्ये खेळवण्यात येणार आहे
दोन्ही संघात तब्बल 17 वर्षांनंतर आयपीएलच्या हंगामातील सलामीचा सामना होतोय, याआधी 2008 साली दोन्ही संघ पहिला सामना खेळले
आयपीएलला 2008 साली सुरुवात, तेव्हा बंगळुरु विरुद्ध कोलकाता यांच्यात पहिला सामना झालेला, तेव्हा कोलकाताचा विजय
दोन्ही संघ नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार, रजत पाटीदार बंगळुरुचं नेतृत्व करणार, तर कोलकाताच्या नव्या कर्णधाराची अद्याप घोषणा नाही