2012 मध्ये भारताचं आव्हान सुपर 8 फेरीतच संपलं होतं. पुन्हा एकदा पदरी निराशा पडली होती.
2014 मध्ये टीम इंडियाने अंतिम फेरी गाठली होती. पण श्रीलंकेने 6 गडी राखून भारताचा पराभव केला होता.
2016 वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडिया उपांत्य फेरीत पोहोचली. पण वेस्ट इंडिजने पुढचा मार्ग रोखला आणि 7 गडी राखून हरवलं.
वर्ल्डकपच्या सातव्या पर्वात टीम इंडियाची कामगिरी सुमार राहिली. उपांत्य फेरीही गाठता आली नाही. या पर्वात पाकिस्तानने भारताला 10 गडी राखून पराभूत केलं होतं.
2022 च्या पर्वात भारताचा प्रवास उपांत्य फेरीत संपला. इंग्लंडने भारताला दहा गडी राखून पराभूत केलं आणि स्वप्न भंगलं.