7 मार्च 2025
एका वनडे सामन्यात कर्णधार रोहित शर्मा किती कमावतो?
रोहित शर्मा भारतीय वनडे संघाचा कर्णधार आहे. 9 मार्चला त्याच्या नेतृत्वात टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळणार आहे.
रोहित शर्माच्या वनडे कारकिर्दिचा हा शेवटचा सामना असू शकतो अशी चर्चा क्रीडावर्तुळात रंगली आहे.
बीसीसीआय आपल्या खेळाडूंना सेंट्रल काँट्रॅक्टसह एका वनडे सामन्यासाठी लाखो रुपये देते.
माहितीनुसार, बीसीसीआय एक वनडे सामना खेळण्यासाठी खेळाडूंना 6 लाख रुपये फी देते.
रोहित शर्माला एक कसोटी सामना खेळण्यासाठी बीसीसीआयकडून 15 लाख रुपये मिळतात. म्हणजेच प्रत्येक दिवसासाठी 3 लाख रुपये असं गणित आहे.
रोहित शर्माला टी20 स्पर्धेतील एक सामना खेळण्यासाठी 3 लाख रुपये मिळत होते.
रोहित शर्माची गणना श्रीमंत खेळाडूंमध्ये होते. त्याची नेटवर्थ कोट्यवधींच्या घरात आहे.
मिडिया रिपोर्टनुसार, रोहित शर्माची सध्याची नेटवर्थ 214 कोटी रुपये आहे.