हार्दिक पांड्या आणि माहिका शर्मा किती शिकले आहेत? वयात किती आहे अंतर ?
Created By: Atul Kamble
6 March 2026
क्रिकेटर हार्दिक पांड्या आणि अभिनेत्री माहिका शर्मा यांचे नाते लपून राहिलेले नाही. अलिकडे हार्दिकने माहिकाचा बड्डे साजरा केला होता
दोघांचे प्रोफेशन वेगळे आहे. हार्दिक - माहिका किती शिकलेत, त्याच्या वयात किती अंतर आहे पाहूयात.
माहिका मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती फिटनेस आणि फॅशन संबंधित कन्टेन्ट बनवते. माहिका दिल्लीची राहिवासी आहे.
माहिकाने दिल्लीच्या नेव्हरी चिल्ड्रन स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतले.नंतर इकॉनॉमिक्स आणि फायनान्समध्ये ग्रॅज्युएशन पूर्ण केले. नंतर तिने अनेक जागी इंटर्नशिप पूर्ण केली
माहिकाने इंटर्नशिप पूर्ण केल्यानंतर एक्टिंगकडे वळली. फ्रिलान्सर म्हणून काम केले. म्युझिक अल्बम आणि चित्रपटात काम केले.
हार्दिक पांड्या याचा जन्म ११ ऑक्टोबर १९९३ रोजी गुजरातच्या सुरत जिल्ह्याच्या चोर्यासीमध्ये झाला. हार्दिकला लहानपणापासून क्रिकेट वेड होते.
हार्दिकने क्रिकेटसाठी ९ नंतर शाळा सोडली. नंतर तो क्रिकेट टीममध्ये सामील झाला आणि भारतासाठी खेळू लागला.
हार्दिक आणि माहिका यांच्या वयात सात वर्षांचे अंतर आहे. माहिका २५ वर्षांची आहे तर हार्दिक ३२ वर्षांचा आहे. परंतू दोघांचे नाते अतुट आहे.