"...Save Lives, आयसीसी अध्यक्ष जय शाह यांची मोठी घोषणा

10 फेब्रुवारी 2025

आयसीसी अध्यक्ष जय शाह इंडिया-इंग्लंड तिसर्‍या वनडेत अवयवदानाबाबत जनजागृती अभियान चालवणार आहेत

लोकांमध्ये अवयदानाबाबत जागृकता निर्माण करणं हा प्रमुख उद्देश आहे

"Donate Organs, Save Lives" असं या जनजागृती अभियानाचं घोषवाक्य आहे

टीम इंडिया विरुद्ध इंग्लंड यांच्यातील तिसरा आणि एकदिवसीय सामना 12 फेब्रुवारीला अहमदाबादमध्ये खेळवण्यात येणार

जय शाह यांनी अवयवदानबाबतच्या मोहिमेबाबत एक्स या सोशल मीडिया अकाउंटवर माहिती दिली

या, सर्वांनी मिळून समाजात बदल घडवुयात, असं आवाहन जय शाह यांनी या पोस्टमधून केलंय

दरम्यान टीम इंडिया 3 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने आघाडीवर, रोहितसेनेला अहमदाबादमध्ये क्लिन स्वीपची संधी