आयपीएल लिलावात हे खेळाडू आले तर खर्च होतील 89 कोटी!
26 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलावाची चर्चा रंगली आहे. असं असताना पाच खेळाडूंबाबत जोरदार चर्चा आहे.
हरभजन सिंगने सांगितलं की रोहित, धोनी, विराट, बुमराह आणि राहुल लिलावात आले तर 89 कोटी खर्च होतील.
धोनीसाठी 22 कोटी, रोहितसाठी 21 कोटी, बुमराहसाठई 20 कोटी, विराट-राहुलसाठी 18-18 कोटी बोली लागेल, असं हरभजनने सांगितलं.
लिलावात धोनी सर्वात जास्त भाव खाऊन जाईल, असं हरभजन सिंगच्या वक्तव्यातून स्पष्ट आहे.
आयपीएल 2025 स्पर्धेत हे सर्व खेळाडू फ्रेंचायझी रिटेन करतील, अशीच दाट शक्यता आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक बोली ऑस्ट्रेलियाच्या मिचेल स्टार्कवर लागली आहे. त्याच्यासाठी 24.75 कोटी मोजले गेलेत.
आयपीएल लिलावात सर्वाधिक बोली कोणत्या खेळाडूवर लागते? हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.