इशान किशनला ज्या संघासाठी खेळायचं नव्हतं, आता त्याचं कर्णधारपद भूषवणार!
3 ऑगस्ट 2024
Created By: राकेश ठाकुर
26 वर्षीय डावखुरा यष्टिरक्षक-फलंदाज इशान किशन या वर्षाच्या सुरुवातीपासूनच टीम इंडियातून बाहेर आहे.
बीसीसीआयने त्याला केंद्रीय करारातून वगळलं. कारण त्याने सूचनेकडे कानाडोळा केला आणि देशांतर्गत क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता.
आता इशान पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या देशांतर्गत हंगामात झारखंड संघाकडून खेळणार आहे. फक्त खेळणार नाही तर संघाचे कर्णधारपदही भूषवू शकतो.
क्रिकबझच्या बातमीनुसार, 26 वर्षीय क्रिकेटपटूने अलीकडेच झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनशी संपर्क साधला होता.
झारखंड असोसिएशनने इशानचा हंगामपूर्व शिबिरात समावेश केला आहे. त्यामुळे झारखंडकडून खेळताना दिसेल.
तयारीसाठी 25 खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यात इशानचाही समावेश असल्याचे सांगण्यात येत आहे.
आता इशानकडे झारखंडचं कर्णधारपद सोपवण्याच्या विचारात आहेत. इशान किशनने अंडर-19 क्रिकेटमध्ये भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे.