18 फेब्रुवारी 2025
पाकिस्तानच्या सर्व खेळाडूंवर रोहित शर्मा एकटाच पडतोय भारी! जाणून घ्या
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा संघ जाहीर केला आहे. पण या सर्व खेळाडूंवर रोहित शर्मा एकटाच भारी पडत असल्याचं दिसत आहे.
रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये मारलेल्या षटकारांची तुलना पाकिस्तानच्या सध्याच्या संघाशी आहे. त्यामुळे बरोबरी होत नसल्याचं दिसत आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या पाकिस्तानच्या खेळाडू्ंच्या षटकारांची संख्या ही एकूण 239 इतकी आहे.
भारतीय कर्णधार रोहित शर्माने वनडे क्रिकेटमध्ये एकट्याने 338 षटकार ठोकले आहेत.
रोहित शर्माच्या तुलनेत चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी निवडलेल्या पाकिस्तानी संघाचे 99 षटकार कमी आहेत.
रोहित शर्मा वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानच्या शाहीद आफ्रिदीने वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक 351 षटकार मारले आहेत. रोहितकडे आता हा विक्रम मोडण्याची संधी आहे. यासाठी त्याला 13 षटकार हवेत.