टीम इंडियाची स्पेशल सेंच्युरी, 147 वर्षाच्या क्रिकेट इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी सामन्यातील पहिल्या डावात टीम इंडिया फक्त 46 धावांवर सर्वबाद झाली. त्यामुळे टीम इंडिया सर्वच बाजूने टीका झाली.
कसोटीतील हा डाव सोडला तर टीम इंडियाने पूर्ण वर्षात कसोटीत चांगली खेळी केली. त्या जोरावर एक खास रेकॉर्ड नोंदवला आहे.
बंगळुरु कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडियाने कमबॅक केलं. त्याचबरोबर 2024 या वर्षात 100 षटकार पूर्ण केले.
147 वर्षात कसोटी अशी कामगिरी करणारा भारत हा पहिला संघ ठरला आहे. यापूर्वी 89 षटकारांसह इंग्लंडच्या नावावर रेकॉर्ड होता.
टीम इंडियाचा 100 वा षटकार विराट कोहलीने मारला. न्यूझीलंडच्या एजाज पटेलच्या गोलंदाजीवर षटकार ठोकला.
न्यूझीलंडने पहिल्या डावात 402 धावा केल्या आणि 356 धावांची आघाडी घेतली. रचिन रवींद्रने शतकी खेळी केली.
न्यूझीलंकडे 356 धावांची आघाडी असूनही टीम इंडियाने कमबॅक केलं. रोहित, विराट आणि सरफराजने अर्धशतकी खेळी केली.