14 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
भारतीय महिला संघाची कर्णधार हरनप्रीत कौर हीने ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात ऐतिहासिक कामगिरी केली
हरमनप्रीतचा ऑस्ट्रेलिया विरुद्धचा तिच्या एकदिवसीय कारकीर्दीतील 150 वा सामना ठरला.
हरमनप्रीत यासह टीम इंडियासाठी 150 सामने खेळणारे तिसरी महिला क्रिकेटर ठरली. याआधी झूलन गोस्वामी आणि मिताली राज या दोघींनी अशी कामगिरी केली होती.
भारतासाठी 150 एकदिवसीय सामने खेळणं खास असल्याचं हरमनप्रीत कौरने म्हटलं. भविष्यातही खेळत राहीन, असा विश्वास हरमनप्रीतने यावेळेस व्यक्त केला.
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया पहिला सामना चंडीगडमधील नव्या मैदानात आयोजित करण्यात आला. हा या ग्राउंडमधील पहिला आंतरराष्ट्रीय सामना ठरला.
आतापर्यंत या मैदानात आयपीएल स्पर्धेतील एकूण 11 सामने खेळवण्यात आले आहेत.
दरम्यान ऑस्ट्रेलियाने या सामन्यात टीम इंडियावर 8 विकेट्सने मात करत 3 सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.