अश्विन-सिराज पैकी कोण? रोहित शर्मा प्लेइंग इलेव्हन बदलणार का?
18 November 2023
Created By: Rakesh Thakur
2023 विश्वचषकाचा अंतिम सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात होणार आहे.
फिरकीपटूंना सामोरं जाताना कांगारू संघाची कायम अडचण होते.
रविचंद्रन अश्विनसमोर ऑस्ट्रेलियन फलंदाज अनेकदा नांगी टाकली आहे.
मोहम्मद सिराजच्या जागी रविचंद्रन अश्विनला खेळवण्याची चर्चा सुरू आहे.
कर्णधार रोहित शर्माने पत्रकार परिषदेत प्लेइंग 11 संदर्भात मोठे वक्तव्य केले आहे.
प्लेइंग 11 मध्ये बदल होणार की नाही याचा निर्णय सामन्यापूर्वी होईल.
15 मध्ये कोणीही खेळू शकतो. प्रत्येक खेळाडूने तयारी करावी असं त्याला वाटते.
आम्ही उद्या खेळपट्टीचे मूल्यांकन करू. 12 ते 13 खेळाडू खेळण्यासाठी तयार आहेत.