8 डिसेंबर 2024
दुसऱ्या कसोटी सामन्यात जसप्रीत बुमराहला बसला फटका
दुसऱ्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला 10 गडी राखून पराभूत केला. या सामन्यात बुमराहचं मोठं नुकसान झालं.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने या सामन्यात चांगली गोलंदाजी केली. तसेच जसप्रीत बुमराहा एका खास लिस्टमध्ये मागे टाकलं.
पॅट कमिन्सने एडिलेट कसोटीतील पहिल्या डावात दोन विकेट घेतल्या. तर दुसऱ्या डावात पाच विकेट घेतल्या.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात 5 गडी बाद करण्याची कमिन्सची ही नववी वेळ आहे.
पॅट कमिन्स वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये सर्वाधिक पाच विकेट घेणारा गोलंदाज ठरला आहे.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप इतिहासात बुमराहने आठवेळा पाच विकेट घेतल्या आहे.
पर्थ कसोटीत बुमराहने पाच विकेट घेत पॅट कमिन्सची बरोबरी केली होती. आता कमिन्स पुन्हा पुढे निघून गेला आहे.