सूर्यकुमार यादव मॅक्सवेलचा तो विक्रम मोडणार, बसं इतकं करावं 

30 November 2023

Created By: Rakesh Thakur

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा T20 सामना रायपूर येथे 1 डिसेंबर रोजी खेळवला जाणार आहे.

चौथ्या टी-20 सामन्यात सूर्यकुमार ऑस्ट्रेलियन अष्टपैलू ग्लेन मॅक्सवेलचा मोठा विक्रम मोडू शकतो.

सूर्यकुमार यादवने पहिल्या सामन्यात 80, दुसऱ्या सामन्यात 19 आणि तिसऱ्या सामन्यात 39 धावा केल्यात.

सूर्यकुमार यादव केवळ चार षटकार मारून ग्लेन मॅक्सवेलला मागे टाकू शकतो.

सूर्याने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या 56 सामन्यांमध्ये 112 षटकार मारले आहेत.

ग्लेन मॅक्सवेलने T20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 115 षटकार ठोकले आहेत.

सूर्यकुमारने 56 टी-20 सामन्यांमध्ये 1979 धावा केल्या आहेत, ज्यात तीन शतकांचा समावेश आहे.