9 ऑक्टोबर 2025
Created By: संजय पाटील
रोहित आणि विराट दोघेही ऑस्ट्रेलिया दौऱ्यात वनडे सीरिजमध्ये खेळणार आहेत. दोघेही चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर मैदानात उतरणार आहेत.
विराट आणि रोहित यांच्यात ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या वनडे सीरिजमध्ये खास सामना पाहायला मिळणार आहे.
रोहित आणि विराट यांच्यात ऑस्ट्रेलियात एकदिवसीय शतकांबाबत चढाओढ पाहायला मिळणार आहे.
रोहितने ऑस्ट्रेलियात 19 डावात 4 एकदिवसीय शतकं झळकावली आहेत.
तर विराट कोहली याने 18 डावात 3 शतकं झळकावली आहेत. विराट रोहितच्या तुलनेत 1 शतकाने मागे आहे. त्यामुळे विराटकडे रोहितला पछाडण्याची संधी आहे.
विराट आणि रोहित या दोघांच्या कारकीर्दीतील ही अखेरची एकदिवसीय मालिका ठरु शकते.
तसेच रोहित आणि विराट देशांतर्गत क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतात. असं झाल्यास युवा खेळाडूंना त्यांच्या अनुभवाचा फायदा मिळू शकतो.