ऋषभ पंत-शुबमन गिल जोडीची बांगलादेश विरुद्ध शतकी खेळी, अनेक रेकॉर्ड ब्रेक
21 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
बांगलादेश विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील तिसरा दिवस पंत-गिल जोडीने गाजवला
दोघांनी दुसऱ्या डावात शतक ठोकलं, या जोडीने चौथ्या विकेटसाठी 167 धावांची भागीदारी केली, भारताने 287वर डाव घोषित केला
त्यामुळे बांगलादेशला विजयासाठी 515 धावांचं आव्हान मिळालं, चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियममधील हे सर्वात मोठं आव्हान
पंतने कसोटी क्रिकेटमध्ये 20 महिन्यांच्या पुनरागमनानंतर शतक ठोकलं
पंतकडून या सहाव्या शतकासह धोनीच्या विक्रमाची बरोबरी, पंत आणि धोनी दोघांच्या नावावर विकेटकीपर फलंदाज म्हणून प्रत्येकी 6-6 शतकं
शुबमन गिलची नाबाद 119 धावांची खेळी, गिलच्या कसोटी कारकीर्दीतील पाचवं तर या वर्षातील तिसरं कसोटी शतक
शुबमन या शतकासह वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीप स्पर्धेतील इतिहासात विराटला मागे टाकत सर्वाधिक 5 शतक करणारा दुसरा भारतीय ठरला