कॅप्टन रोहितची चेन्नई कसोटीत ऐतिहासिक कामगिरी
22 सप्टेंबर 2024
Created By: संजय पाटील
रोहितच्या नेतृत्वात टीम इंडियाचा बांगलादेशवर पहिल्या कसोटीत 280 धावांनी विजय, मालिकेत 1-0 ने आघाडी
रोहितने या विजयासह इतिहास रचला, हिटमॅन चेन्नईत सप्टेंबरमध्ये सामना जिंकणारा पहिला भारतीय कर्णधार ठरला
भारताने चेन्नईत 1934 पासून आतापर्यंत 35 सामने खेळले आहेत, त्यापैकी 4 सामने हे सप्टेंबरमध्ये पार पडले आहेत.
इंडिया-बांगलादेश यांच्यातील हा सामना चेन्नईतील सप्टेंबर महिन्यातील एकूण चौथा सामना ठरला
भारताने यासह रोहितच्या नेतृत्वात चेन्नईत सप्टेंबर महिन्यात सामना जिंकण्याचा कारनामा केला
भारताने याआधीचे 3 पैकी 2 सामने अनिर्णित सोडवले, तर 1 मॅच टाय राहिली
चेन्नईमध्ये 1986 नंतर पहिल्यांदा सप्टेंबरमध्ये सामना आयोजित करण्यात आला