11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

दुसऱ्या कसोटीत अश्विनने रचला इतिहास, मोडला 45 वर्षे जुना विक्रम

5 फेब्रुवारी 2024

Created By: Rakesh Thakur

इंग्लंडविरुद्धच्या पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना भारताने जिंकला.

विशाखापट्टणममधील सामना 106 धावांनी जिंकला आणि मालिकेच 1-1 ने बरोबरी साधली.

दुसऱ्या कसोटीत अनुभवी फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनने एकूण तीन बळी घेतले. तसेच एका विक्रमाची नोंद केली आहे.

आर अश्विन इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक बळी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे.

अश्विनने माजी फिरकीपटू भागवत चंद्रशेखर यांचा विक्रम मोडीत काढला आहे. 45 वर्षांपासून हा विक्रम अबाधित होता.

अश्विनने इंग्लंडविरुद्धच्या 21 कसोटी सामन्यांमध्ये 97  बळी घेतले आहेत. चंद्रशेखरने 1964 ते 1979 दरम्यान 23 कसोटीत 95 बळी घेतले.

इंग्लंडच्या बेन डकेटला बाद करून त्याने चंद्रशेखरचा 45 वर्ष जुना विक्रम मोडीत काढला.

आता इंग्लंड विरुद्ध 100 विकेट्स पूर्ण करण्यापासून फक्त तीन विकेट दूर आहे.