रोहित शर्माने सुनील गावस्कर यांना पछाडत घडवला इतिहास
18 ऑक्टोबर 2024
Created By: संजय पाटील
रोहितने न्यूझीलंड विरूद्धच्या पहिल्या कसोटीतील दुसऱ्या डावात बंगळुरुतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये झळकावलं अर्धशतक
रोहित पहिल्या डावात फ्लॉप, तर दुसऱ्या डावात 63 बॉलमध्ये 52 रन्स
रोहितने या स्टेडियममधील या सहाव्या अर्धशतकासह (50+ ) गावस्करांचा सर्वाधिक 50+ धावांचा विक्रम उद्धवस्त केला
गावस्करांनी या स्टेडियममध्ये 5 वेळा तर सचिनने 9 वेळा 50+ धावा केल्या आहेत
रोहितच्या नावे या स्टेडियममध्ये आता एकूण 763 आंतरराष्ट्रीय धावांची नोंद, हिटमॅनच्या कोणत्याही एका मैदानातील या सर्वाधिक धावा
रोहित एका कसोटी सामन्यातील दोन्ही डावात बोल्ड होण्याची ही पहिलीच वेळ ठरली
रोहित आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओपनर म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्यांमध्ये 15 हजार 234 धावांसह आठव्या स्थानी