शुबमनसाठी टीम मॅनजमेंटकडून संजू सॅमसनच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल

10  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

शुबमन गिल याचं आशिया कप 2025 स्पर्धेनिमित्ताने टी 20i भारतीय संघात कमबॅक झालं. 

शुबमन गिल याला कमबॅकसह उपकर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली. अक्षर पटेल याच्याकडे असलेलं उपकर्णधारपद काढून घेतलं. 

भारताने आशिया कप 2025 स्पर्धेतील आपला पहिला सामना यूएई विरुद्ध खेळला. भारताने हा सामना 9 विकेट्सने जिंकला.

या सामन्यात शुबमन गिल याच्यासाठी संजू सॅमसन याच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल करण्यात आला. 

आतापर्यंत अनेक टी 20i सामन्यांमध्ये ओपनिंग करणाऱ्या संजू सॅमसन याच्या जागी शुबमन गिल अभिषेक शर्मा याच्यासह सलामीला आला.

शुबमनसाठी  संजूच्या बॅटिंग ऑर्डरमध्ये बदल केल्याने चाहत्यांकडून नाराजी व्यक्त करण्यात आली.

शुबमनने यूएई विरुद्ध 58 धावांचा पाठलाग करताना नॉट आऊट 20 रन्स केल्या आणि भारताला 9 विकेट्सने जिंकवलं. 

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा