कॅप्टन सूर्यकुमारने अखेर अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवली, यूएईविरुद्ध काय झालं?

10  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

भारतीय संघाने आशिया कप 2025 स्पर्धेतील आपल्या पहिल्या सामन्यात यूएई विरुद्ध अनेक महिन्यांची प्रतिक्षा संपवली.

भारतीय कर्णधार सूर्यकुमार यादव याने या सामन्यात टॉस जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. हा टॉस भारतासाठी खास ठरला.

भारताने तब्बल 15 आंतरराष्ट्रीय सामने आणि 221 दिवसांनंतर टॉस जिंकला.  भारताने याआधी 31 जानेवारी ते 31 जुलै 2025 दरम्यान 15 सामन्यांमध्ये टॉस गमावले.

या कालावधीत रोहित शर्माच्या नेतृत्वात 8, शुबमनच्या कॅप्टन्सीत 5 आणि सूर्याच्या कर्णधारपदात 2 वेळा विरोधात नाणेफेकीचा कौल लागला.

सलग 15 वेळा टॉस गमावण्याच्या या मालिकेला सूर्यकुमार यादव याच्या नेतृत्वात सुरुवात झाली होती. टॉस गमावण्याची मालिका सूर्याच्याच नेतृत्वात खंडीत झाली.

सूर्याची आशिया कप स्पर्धेत नेतृत्व करण्याची ही पहिलीच वेळ आहे. भारताने सूर्याच्या नेतृत्वात यूएईवर 9 विकेट्सने मात करत विजयी सलामी दिली. 

टीम इंडिया या मोहिमेतील आपला दुसरा सामना हा 14 सप्टेंबरला पाकिस्तान विरुद्ध खेळणार आहे.

आशिया कप 2025 पूर्वी संजू सॅमसनने केली मोठी घोषणा