11 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
जसप्रीत बुमराह याने बुधवारी 10 सप्टेंबरला यूएई विरूद्धच्या सामन्यात पहिलीच विकेट घेतली. बुमराहने अचूक यॉर्कर टाकत यूएईला पहिला झटका दिला.
बुमराहसाठी ही विकेट खास ठरली. बुमराहची यासह 438 दिवसांची प्रतिक्षा संपली.
बुमराहने टी 20i क्रिकेटमध्ये अखेरची विकेट 438 दिवसांआधी घेतली होती. बुमराह अखेरचा टी 20i सामना वर्ल्ड कप 2024 स्पर्धेत खेळला होता.
बुमराहने यूएई विरुद्ध 1 विकेट घेत आपला दबदबा कायम ठेवला. बुमराहने यासह आशिया कप स्पर्धेत किमान 1 विकेट घेण्याची परंपरा कायम ठेवली.
बुमराह आतापर्यंत आशिया कप स्पर्धेत एकूण 13 सामने खेळला आहे. बुमराहने या सर्व सामन्यात किमान 1 विकेट घेतली आहे.
तसेच बुमराह प्लेइंग ईलेव्हनमध्ये असताना टीम इंडियाचा आतापर्यंत एकदाही आशिया कप स्पर्धेत पराभव झालेला नाही.
बुमराह आशिया कप स्पर्धेत लकी ठरला आहे. बुमराहने यूएई विरुद्ध 3 ओव्हरमध्ये 19 धावा दिल्या आणि 1 विकेट मिळवली.