आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत सर्व सामने जिंकणारा भारत एकमेव संघ

21  सप्टेंबर 2025

Created By:  संजय पाटील

आशिया कप स्पर्धेत आतापर्यंत एकूण 14 सामने झाले आहेत. सध्या सुपर 4 फेरीतील सामने खेळवण्यात येत आहेत. भारत, पाकिस्तान, बांगलादेश आणि श्रीलंका सुपर 4 मध्ये पोहचले आहेत.

सुपर 4 मधील पहिल्या सामन्यात बांगलादेशने श्रीलंकेला पराभूत करत विजयी सुरुवात केली आणि साखळी फेरीतील पराभवाची परतफेड केली. 

बांगलादेशने यासह यासह श्रीलंकेचा विजय रथ रोखला. त्याआधी श्रीलंकेने साखळी फेरीतील तिन्ही सामने जिंकले होते. 

आशिया कप 2025 स्पर्धेत आतापर्यंत भारतीय संघाने सर्व सामने जिंकले आहेत. त्याव्यतिरिक्त सर्व संघांना किमान 1-1 सामना गमवावा लागला आहे.

टीम इंडियाने साखळी फेरीत यूएई, पाकिस्तान, ओमानला पराभूत केलं. त्यानंतर सुपर 4 मध्ये पुन्हा पाकिस्तानवर विजय मिळवला.

टीम इंडियाने या विजयासह आशिया कप 2025 स्पर्धेत विजयी चौकार लगावला.

तसेच टीम इंडियाने सुपर 4 मध्ये विजयी सुरुवात करत अंतिम फेरीच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलं आहे. टीम इंडिया आशिया कप 2023 गतविजेता आहे.

अखेर ती माझ्या आयुष्यात आली..; 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम निखिल बनेची पोस्ट चर्चेत