21 ऑगस्ट 2025
Created By: संजय पाटील
आशिया कप 2025 स्पर्धेत भारत-पाकिस्तान सामना होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. तीव्र विरोधानंतरही पाकिस्तान विरुद्ध खेळण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे.
क्रीडा मंत्रालयाच्या नव्या धोरणानुसार, टीम इंडियाला पाकिस्तान विरुद्ध कोणत्याही स्पर्धेत खेळण्यापासून रोखलं जाणार नाही.
आशिया कप स्पर्धेत भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील सामना हा 14 सप्टेंबरला होणार आहे.
आशिया कप स्पर्धेत उभयसंघात किमान 1 सामना होणार असल्याचं निश्चित आहे. तसेच या संघात आणखी 2 असे एकूण 3 सामने होऊ शकतात.
साखळीनंतर उभयसंघात सुपर 4 आणि त्यानंतर अंतिम सामन्यात दोन्ही संघ आमनेसामने येऊ शकतात.
आशिया कप स्पर्धेच्या यजमानपदाचा मान भारताकडे होता. मात्र पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तान विरुद्ध तीव्र संताप आहे. त्यामुळे या स्पर्धेचं आयोजन हे यूएईमध्ये करण्यात आलं आहे.
आशिया कप स्पर्धेला 9 सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. भारतीय संघ या स्पर्धेतील आपला पहिला सामना हा 10 सप्टेंरला यूएई विरुद्ध खेळणार आहे.