आतापर्यंत झालेल्या सर्व टी20 वर्ल्डकप स्पर्धेत या दोन खेळाडूंचा सहभाग
16 मे 2024
Created By : राकेश ठाकुर
टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा टी20 वर्ल्डकप स्पर्धेच्या 9 पर्वात खेळणारा खेळाडू ठरेल. 5 जूनला मैदानात उतरताच हा विक्रम नावावर होईल.
वनडे वर्ल्डकप स्पर्धेत टीम इंडियाला अंतिम फेरीत पराभवाचा सामना करावा लागला होता. झालं गेलं विसरून टीम इंडिया पुन्हा सज्ज आहे.
2007 टी20 वर्ल्डकप स्पर्धेत भारतीय संघाने जेतेपदावर नाव कोरलं होतं. तेव्हा रोहित शर्मा संघात होता.
क्रिकेटपटू रोहित शर्मा टी20 इतिहासात 3974 धावा करत दुसऱ्या क्रमांकावर आहे.
टी20 स्पर्धेत सर्वाधिक शतकांना मानही रोहितच्या नावावर आहे. त्याने आतापर्यंत पाच शतकं ठोकली आहेत.
बांगलादेशचा शाकिब अल हसन हा सर्व टी20 वर्ल्डकप खेळणारा दुसरा खेळाडू आहे.
शाकिब अल हसन सध्या आयसीसी टी20 क्रमवारीत अव्वल क्रमांकाचा अष्टपैलू खेळाडू आहे.
शाकिब अल हसनने 2404 धावा आणि 145 विकेट्स घेतल्या आहेत. 145 विकेट्ससह सर्वाधिक बळी घेणारा दुसरा गोलंदाज आहे.