दिग्गज खेळाडूने पाकिस्तानचा प्रशिक्षक होण्याची व्यक्त केली इच्छा

6 December 2023

Created By: Rakesh Thakur

वनडे वर्ल्डकप 2023 स्पर्धेत भारताचा माजी क्रिकेटपटू अजय जडेजा अफगाणिस्तानचा मेंटॉर होता. 

आता अजय जडेजा याचं एक वक्तव्य चर्चेत आलं आहे. त्यात त्याने पाकिस्तानचा कोच होण्याची इच्छा व्यक्त केली आहे.

अफगाणिस्तानची तुलना पाकिस्तान संघाशी करत एक प्रश्न विचारला होता. त्यावर त्याने पटकन उत्तर दिलं. 

"मी अफगानी संघालाा धडे दिले. माझ्या मते पाकिस्तान पण कधीतरी अफगाणिस्तानसारखाच होता."

"अफगाणिस्तान संघात जे खेळाडू राखीव आहेत ते सध्याच्या टीमपेक्षा जबरदस्त आहेत."

जडेजाने पाकिस्तानी संघासोबतच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला. तेव्हा आम्ही लोकांशी दिलखुलासपणे बोलायचो. 

अजय जडेजाने 13 वनडे सामन्यात टीम इंडियाचं नेतृत्व केलं. तर 196 सामने खेळला आहे. यात तीन वर्ल्डकपचा समावेश आहे.