टीम इंडियाचा कर्णधार आणि आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळणाऱ्या रोहित शर्मा घड्याळांची आवड आहे.
रोहित जवळ हबलोटपासून पाटेक फिलिप्पसारख्या कंपन्यांची महागडी घड्याळ आहेत. यांची किंमत लाखो कोटींच्या घरात आहे.
मीडिया रिपोर्टनुसार, रोहित 6 प्रकारची महागडी घड्याळ वापरतो. यांची किंमत 4.20 कोटी रुपये आहे.
रोहित शर्मा हबलोटचं एरोफ्यूजन किंग गोल्ड घड्याळ घालतो. याची किंमत 14 लाख रुपये आहे. याच कंपनीचं आणखी एक घड्याळ त्याच्याकडे असून त्याची किंमत 35 लाख आहे.
रोहित शर्माकडे Audemars Piguet कंपनीचं घड्याळ आहे. याची किंमत 22 लाख रुपये आहे.
रोहित शर्मा रोलेक्सचंही घड्याळ वापरतो. या घड्याळाची किंमत 51 लाख रुपये आहे.
रोहित शर्माजवळ पाटेक फिलिप्पची दोन महागडी घड्याळ आहेत. यात एकाची किंमत 1.1 कोटी, तर दुसऱ्याची किंमत 1.7 कोटी आहे.