मुंबई इंडियन्स असं मिळवणार प्लेऑफमध्ये स्थान

14 April 2024

Created By: Rakesh Thakur

आयपीएल स्पर्धेत मुंबई इंडियन्सची कामगिरी निराशाजनक राहिली आहे. सहा पैकी चार सामन्यात पराभवाचं तोंड पाहिलं आहे. 

गुणतालिकेत मुंबईची आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. मात्र असं असलं तरी मुंबईला कमी लेखणं महागात पडू शकतं.

मुंबई इंडियन्सने उर्वरित आठ पैकी 6 सामन्यात विजय मिळवला तर प्लेऑफमध्ये स्थान मिळवता येईल. 

मुंबईला कोलकाता लखनौसोबत प्रत्येकी दोन सामने खेळेल. तर पंजाब, राजस्थान, हैदराबाद आणि दिल्लीशी भिडणार आहे.

मुंबई इंडियन्सने 2014 च्या आयपीएल स्पर्धेत पाच सामने गमावले होते. मात्र तरीही टीम प्लेऑफमध्ये पोहोचली. 

आयपीएल 2015 मध्येही सुरुवातीचे चार सामने गमावलेले. मात्र मुंबई इंडियन्सने जेतेपदावर नाव कोरलं.

मुंबईचे दिग्गज खेळाडू फॉर्मात आहेत. रोहित,इशान, बुमराह यांना चांगली लय सापडली असून सामना जिंकवण्याची ताकद आहे.