आयपीएलमध्ये ट्रेंट बोल्टने घेतली अनोखी हॅटट्रीक
24 मे 2024
Created By : राकेश ठाकुर
आयपीएलमध्ये गोलंदाजांची काही खैर नसते. पॉवर प्ले सर्वाधिक धुलाई होते. पण एक गोलंदाज अशा परिस्थितीतही उरून पुरला.
राजस्थानचा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्ट पहिल्याच षटकात विकेट घेण्यात यशस्वी ठरला.
बोल्टने या पर्वात पहिलं षटक टाकताना 7 गडी बाद केले. या बाबतीत तो अव्वल स्थानी आहे.
ट्रेंट बोल्ट 2022, 2023 मध्ये पहिल्या षटकात सर्वाधिक विकेट घेणारा गोलंदाज होता.
ट्रेंट बोल्टने 2022 च्या पर्वात पहिल्या षटकात 6 आणि शेवटच्या षटकात 7 विकेट्स घेतल्या होत्या.
आयपीएल 2023 मध्ये ट्रेंट बोल्टने पहिल्याच षटक टाकताना 8 विकेट घेत विक्रम केला होता.
ट्रेंट बोल्टने 2024 मध्ये पॉवर प्लेमध्ये एकूण 12 विकेट्स घेतल्या. या बाबततही तो अव्वल स्थानी आहे.