11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

चेन्नई विरुद्ध मैदानात उतरताच विराट कोहली रचणार इतिहास

11 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

इंडियन प्रीमियर लीगचं 17वं पर्व 22 मार्चपासून सुरू होणार आहे.

आयपीएलच्या पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आमनेसामने येणार आहेत. 

चेन्नईत होणाऱ्या सामन्याद्वारे विराट कोहली आरसीबीसाठी 17 वर्षे खेळण्याचा विक्रम लिहील.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु फ्रँचायझीने विराट कोहलीची अंडर-19 खेळाडूंच्या यादीतून निवड केली होती.

लीग क्रिकेटमध्ये 16 वर्षे एकाच फ्रँचायझीसाठी खेळणारा तो जगातील एकमेव खेळाडू आहे.

18 एप्रिल 2008 रोजी आरसीबीकडून पदार्पण करणारा विराट कोहली आतापर्यंत 237 आयपीएल सामने खेळला आहे. 

विराट कोहलीने 7 शतके आणि 50 अर्धशतकांसह 7263 धावा केल्या.