11 December 2023

Created By: Rakesh Thakur

11  December 2023

Created By: Rakesh Thakur

आयपीएल 2025 लिलावाबाबत मोठी अपडेट, असा असेल नियम

11 मार्च 2024

Created By: Rakesh Thakur

आयपीएल 2024 स्पर्धेनंतर 2025 स्पर्धेसाठी मेगा लिलाव पार पडणार आहे. 

पुढील वर्षी सर्वच संघ बदलणार हे जवळपास निश्चित झाले आहे.

मेगा लिलावापूर्वी प्रत्येक फ्रँचायझीला 3-4 खेळाडू कायम ठेवण्याची संधी असेल, असे अरुण धुमाळ यांनी सांगितले.

एकूण 25 पैकी 21 खेळाडूंना संघातून मुक्त करावे लागेल, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.

आयपीएल मेगा लिलावाच्या नियमांनुसार, चार खेळाडू कायम ठेवायचे असतील तर त्यासाठी 42 कोटी रुपये मोजावे लागतील.

तीन खेळाडूंसाठी 33 कोटी, दोन खेळाडूंसाठी 24 कोटी आणि एका खेळाडूसाठी 14 कोटी मोजावे लागतील. 

राष्ट्रीय संघात न खेळणाऱ्या खेळाडूला कायम ठेवल्यास 4 कोटी रुपये द्यावे लागली असा नियम आहे. मेगा लिलावतही हाच नियम लागू होईल.