युवा विस्फोटक फलंदाज युर्विल पटेल याची चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये एन्ट्री
6 May 2025
Created By: Sanjay Patil
वंश बेदी बाहेर झाल्याने चेन्नई सुपर किंग्स टीममध्ये एका खेळाडूचा समावेश करण्यात आला आहे.
गुजरातसाठी खेळणाऱ्या उर्विल पटेल याला चेन्नई सुपर किंग्स टीमने संधी दिली आहे
उर्विल पटेल विस्फोटक खेळीसाठी ओळखला जातो, उर्विलने 28 चेंडूत शतक झळकावलंय
तसेच उर्विलने वनडेत विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेत 41 चेंडूत शतक लगावलंय
उर्विलने टी 20 मध्ये 40 पेक्षा कमी चेंडूत 2 वेळा शतक केलंय, असं कोणत्याच दुसऱ्या भारतीयाला जमलेलं नाही
उर्विलने सीएसकेकडून ट्रायल दिली होती, मात्र त्याच्याऐवजी आयुष म्हात्रे याला संधी देण्यात आली
उर्विलचा उर्वरित 3 सामन्यांसाठी टीममध्ये समावेश, उर्विलला 30 लाख रुपयात करारबद्ध करण्यात आलं
चेन्नई सुपर किंग्सचं IPL 2025 मधील आव्हान संपुष्ठात, चेन्नई 7 मे रोजी केकेआर विरुद्ध भिडणार
5 रुपयांची ही वस्तू तुमच्या तिजोरीत ठेवा, आर्थिक प्रश्न पटापट सुटतील!
स्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा