आयपीएलमध्ये पहिल्यांदाच हा नियम वापरला जाणार!

19 मार्च 2025

आयपीएल स्पर्धेच्या 18 व्या मोसमाला 22 मार्चपासून सुरुवात, सलामीच्या सामन्यात बंगळुरु विरुद्ध कोलकाता 

18 व्या मोसमाआधी bcci चा मोठा निर्णय, आता वाईडसाठी डीआरएस घेण्याची परवानगी मिळणार

रिपोर्टनुसार, ऑफ स्टंपबाहेरील आणि उंचीमुळे देण्यात आलेल्या वाईडच्या निर्णयाला डीआरएसद्वारे आव्हान देता येणार

हॉक आय आणि बॉल ट्रॅकिंगद्वारे वाईड बॉल आहे की नाही? हे तपासलं जाणार

तसेच बीसीसीआय बॉलवर थुंकी न लावण्याचा निर्णय मागे घेऊ शकते, कोव्हिडमध्ये हा निर्णय घेण्यात आला होता

आयसीसीनेही अजूनही बॉलवर थुंकी न लावण्याचा निर्णय कायम ठेवलाय, बीसीसीआय याबाबत 20 मार्चपर्यंत निर्णय घेऊ शकते

18 व्या मोसमाआधी 20 मार्चला सर्व कर्णधार मुंबईत एकत्र येणार आहेत, कर्णधारांमध्ये नियमांबाबत चर्चा होणार