सीएसके अश्विन आणि शमीला संघात घेण्यासाठी उत्सूक

25 सप्टेंबर 2024

Created By: संजय पाटील

आयपीएल 2025 मेगा ऑक्शन नोव्हेंबर किंवा डिसेंबर 2024 या वर्षात होण्याची शक्यता

मीडिया रिपोर्ट्सनुसार, यंदा आयपीएल 2025 चं ऑक्शन गेल्या वर्षाप्रमाणे परदेशातच होणार

रिपोर्ट्सनुसार, सीएसके अश्विन आणि शमीला आपल्या ताफ्यात घेण्यासाठी प्रयत्नशील

अश्विन आणि शमीला ताफ्यात घेण्यासाठी रिटेंशन सीएसकेसाठी अडचणीचं ठरतंय 

सीएसकेला या दोघांना घ्यायचं असेल तर त्यासाठी  दोघांच्या विद्यमान संघांनी त्यांना करारमुक्त करणं आवश्यक

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 2025 मधील हंगामासाठी प्रत्येक संघ किमान 5 खेळाडू कायम ठेवू शकते, मात्र याबाबत अधिकृत घोषणा नाही

या 5 पैकी 3 भारतीय असतील, आधी ही संख्या 2 होती, त्यामुळे आता रिटेंशनबाबत बीसीसीआय काय निर्णय घेते? याकडेही साऱ्यांचं लक्ष आहे