आयपीएलच्या एका सामन्यात 24 खेळाडू खेळणार

20 मार्च 2025

22 मार्चपासून आयपीएल 2025 ची सुरुवात होत आहे, क्रिकेट चाहत्यांमध्ये उत्साह

आयपीएलच्या 18 व्या मोसमात एकूण 10 संघ सहभागी होणार, तसेच 74 सामने खेळवण्यात येणार

या हंगामातील पहिल्या सामन्यात कोलकाता विरुद्ध बंगळुरु आमनेसामने असणार आहेत

कोलकाता आणि बंगळुरु दोन्ही संघाचे प्रत्येकी 12-12 असे 24 खेळाडू खेळणार, साधारणपणे एका संघाकडून 11 खेळाडू खेळतात

आयपीएल इमपॅक्ट प्लेअर नियमामुळे प्रत्येक सामन्यात 22 ऐवजी 24 खेळाडू खेळणार

टॉसनंतर दोन्ही संघाना अंतिम 11 खेळाडूंशिवाय 5-5 जणांची नावं द्यावी लागतात, त्यापैकी एकाला इमपॅक्ट प्लेअर म्हणून घेतलं जातं

इमपॅक्ट प्लेअरला सामन्यादरम्यान गरजेनसुार बोलावलं जातं, तर मुख्य संघातील एका खेळाडूला बाहेर जावं लागतं, त्याला पुन्हा खेळता येत नाही