मोठ्या क्रिकेटपटूचं लिव्हर फेल, गुडगावमध्ये मृत्यूशी झुंज
5 सप्टेंबर 2024
Created By: राकेश ठाकुर
आयर्लंडचा अष्टपैलू सिमी सिंह अडचणीत आहे. त्याला गंभीर आजाराने ग्रासलं आहे.
सिमी सिंह लिव्हर खराब झाला आहे आणि त्याच्यावर गुडगांव मेदांता हॉस्पिटलमध्ये भरती आहे.
सिमी सिंह एक्यूट लिव्हर फेलियरने त्रस्त आहे. म्हणजेच लिव्हर ट्रान्सप्लांट केल्याशिवाय पर्याय नाही.
सिमी सिंहने घरच्यांना सांगितलं की, आयर्लंडमध्ये वारंवार ताप येत होता. तिथे डॉक्टरांना समजलं नाही. भारतात उपचार केले असता त्यात लिव्हर खराब झाल्याचं दिसलं.
सिमी सिंहला त्याची पत्नी अगमदीप कौर लिव्हरचा काय भाग देण्यास तयार आहे. ही सर्जरी लवकरच होऊ शकते.
सिमी सिंहचा जन्म पंजाबच्या बथलानामध्ये 1987 मध्ये झाला होता. अंडर 14 आणि अंडर 17 लेव्हल क्रिकेट भारतात खेळला आहे. त्यानंतर आयर्लंडला गेला.
सिमी सिंह आयर्लंडचा मोठा अष्टपैलू आहे. त्याने वनडेत 39 विकेट आणि टी20 क्रिकेटमध्ये 44 विकेट आहेत.