धोनीबाबत हरभजन सिंगने जे काही सांगितलं ते खोटं होतं?
3 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
हरभजन सिंगने धोनीबाबत केलेलं एक वक्तव्य सध्या वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे.
हरभजनने सांगितलं होतं की, त्याने धोनीला टीव्ही फोडताना पाहिलं होतं.
आरसीबीविरुद्ध सामना हरल्यानंतर धोनीने रागाच्या भरात ड्रेसिंग रुमच्या बाहेरील टीव्ही पंच मारून फोडली होती.
हरभजन सिंगचं हे वक्तव्य सीएसकेच्या फिजिओथेरेपिस्टने फेटाळून लावलं आहे.
सीएसकेचे फिजिओ टॉमी सिमसेकने सांगितलं की, टीव्ही फोडण्याची बातमी खोटी आहे. धोनीने कधीच असं केलं नाही.
टॉमीने सांगितलं की, धोनी कधीच इतका आक्रमक नव्हता. हे वक्तव्य खोटं आहे.
आता हरभजन सिंग खरं बोलतोय की टॉमी खोटं बोलतोय? हे आता सांगणं कठीण आहे.