हार्दिक पांड्याला 18 कोटी रुपये देणं योग्य आहे का?
3 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
मेगा लिलावापूर्वी माजी क्रिकेटपटू आणि आयपीएल विजेते प्रशिक्षक टॉम मूडी यांनी प्रश्न उपस्थित केला आहे.
टॉम मूडी यांनी सांगितलं की, हार्दिक पांड्याला 18 कोटी द्यायचे की नाही याचा विचार मुंबई इंडियन्सला करावा लागेल.
बुमराह आणि सूर्यकुमार यादव असे खेळाडू आहे त्याने प्रत्येकी 18 कोटी मिळायला हवेत, असंही त्यांनी सांगितलं.
मागच्या पर्वात पांड्या खराब खेळला. सातत्यपूर्ण कामगिरी करणाऱ्या खेळाडूंना 18 कोटी मिळाले पाहीजेत, असंही ते पुढे म्हणाले.
टॉम मूडी यांच्या मते, मुंबई इंडियन्स हार्दिक पांड्याला 14 कोटी देऊन रिटेन करू शकते.
आयपीएलच्या नव्या नियमानुसार संघ सहा खेळाडूंना कायम ठेवू शकतात.
आयपीएल 2025 स्पर्धेपूर्वी मेगा लिलाव पार पडणार आहे. यासाठी सर्वच संघांनी कंबर कसली आहे.