पाकिस्तानचं उपांत्य फेरीचं कठीण, जाणून घ्या नेट रनरेटचं गणित
07 November 2023
Created By: Rakesh Thakur
भारत, दक्षिण अफ्रिका आणि ऑस्ट्रेलियाने उपांत्य फेरीत धडक मारली आहे.
चौथ्या स्थानासाठी न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये चुरस आहे.
न्यूझीलंड, पाकिस्तान आणि अफगाणिस्तानचे प्रत्येकी 8 गुण आहेत. प्रत्येकी एक सामना शिल्लक आहे.
नेट रनरेटच्या गणितात न्यूझीलंड वरचढ आहे. पाकिस्तानला नुसता विजय मिळवून चालणार आहे.
न्यूझीलंडचा 0.398 नेट रनरेट, तर पाकिस्तानचा 0.036 नेट रनरेट आहे
न्यूझीलंडने श्रीलंकेवर 1 धावेनी जरी विजय मिळवला तर पाकिस्तानला महागात पडेल.
पाकिस्तानला काहीही करून पुढचा सामना 130 धावांनी जिंकावा लागणार आहे.