13 सप्टेंबर 2025
Created By: संजय पाटील
देशांतर्गत क्रिकेटमधील स्टार ऑलराउंडर जलज सक्सेना नव्या संघासह जोडला गेला आहे.
जलज सक्सेना केरळ क्रिकेट संघासह जोडला गेला होता. आता जलज रणजी ट्रॉफी 2025-26 मोसमाआधी महाराष्ट्र टीमसह जोडला गेला आहे.
जलज सक्सेना केरळ टीममधील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. जलजने 9 वर्ष केरळचं प्रतिनिधित्व केलं. मात्र आता जलज नव्या संघाकडून खेळण्यासाठी सज्ज झाला आहे.
जलज सक्सेना महाराष्ट्र टीमसह जोडला जाणारा दुसरा सर्वात मोठा खेळाडू आहे. जलजआधी पृथ्वी शॉ महाराष्ट्र टीममध्ये दाखल झाला होता.
जलजला देशांतर्गत क्रिकेटमध्ये जवळपास 20 वर्षांचा अनुभव आहे. जलजने 2005 साली एमपीसाठी फर्स्ट क्लास डेब्यू केल होता. तर जलज 2016 साली केरळ संघासह जोडला गेला होता.
जलजने आतापर्यंत 150 फर्स्ट क्लास सामन्यांमध्ये 14 शतकं आणि 34 अर्धशतकांसह 33.77 च्या सरासरीने एकूण 7 हजार 60 धावा केल्या आहेत.
जलजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 484 विकेट्स घेतल्या आहेत. तसेच जलज 109 लिस्ट ए सामने खेळला आहे. जलजने लिस्ट ए क्रिकेटमध्ये 2056 धावा करण्यासह 123 विकेट्स मिळवल्या आहेत.