जेम्स अँडरसनकडून प्रवीण तांबेचा रेकॉर्ड ब्रेक

14 ऑगस्ट 2025

Created By:  संजय पाटील

जेम्स अँडरसन फ्रँचायजी लीग स्पर्धेच्या इतिहासात पदार्पण करणारा सर्वात वयस्कर खेळाडू ठरला.

जेम्स अँडरस याने यासह भारतीय गोलंदाजाचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. या भारतीय गोलंदाजाच्या जीवनावर सिनेमा बनवण्यात आला होता.

प्रवीण तांबे याने 2013 साली वयाच्या 41 वर्ष 211 व्या दिवशी राजस्थान रॉयल्सकडून आयपीएल पदार्पण केलं होतं.

प्रवीण तांबे याच्या जीवनावर आधारित एक सिनेमा काही वर्षांपू्र्वी प्रदर्शित करण्यात आला होता. 'कौन है प्रवीण तांबे' असं या सिनेमाचं नाव होतं.

प्रवीण तांबे याने आयपीएल कारकीर्दीत 28 विकेट्स घेतल्या होत्या. तसेच तांबेने लिस्ट ए आणि फर्स्ट क्लास क्रिकेटमधील एकूण 8 सामन्यांमध्ये 7 विकेट्स मिळवल्या.

जेम्स अँडरसन याने 2025 मध्ये द हंड्रेड या स्पर्धेत वयाच्या 43 वर्ष 7 व्या दिवशी पदार्पण करत प्रवीण तांबेचा रेकॉर्ड ब्रेक केला. 

अँडरसनने कसोटी क्रिकेटला अलविदा केल्यानंतर फ्रँचायजी लीगमध्ये पदार्पण केलं. अँडरसनने कसोटी कारकीर्दीत एकूण 704 विकेट्स घेतल्या होत्या.

न्यूझीलंडने कसोटी इतिहासातील तिसरा सर्वात मोठा विजय नोंदवला