19 ऑगस्ट 2025
Created By: राकेश ठाकुर
आशिया कप स्पर्धा 9 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. यासाठी 15 सदस्यीय संघ जाहीर केला आहे.
भारतीय संघात जसप्रीत बुमराहलाही स्थान देण्यात आलं आहे. त्यामुळे तो फीट असल्याचं दिसत आहे.
इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत बुमराहला पाच पैकी तीन सान्यात खेळवलं होतं. त्यामुळे वादाला फोडणी मिळाली होती.
अजित आगरकरने सांगितलं की, 'सध्या कोणतीही लिखित योजना नाही. इंग्लंड कसोटी मालिकेत त्याला चांगला ब्रेक मिळाला.'
'संघ व्यवस्थापन, फिजिओ किंवा संबंधित लोक नेहमीच संपर्कात असतात. हे फक्त आताच नाही तर दुखापतीपूर्वीही घडले आहे.'
'आम्ही त्याची काळजी घेण्याचा प्रयत्न केला आहे कारण आम्हाला माहित आहे की तो किती मौल्यवान आहे.'
भारतीय संघाला बुमराह सर्व मोठ्या सामन्यांसाठी उपलब्ध असावा असे वाटते.