141 चेंडूनंतर जसप्रीत बुमराहची प्रतीक्षा संपली
20 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
बंगळुरु कसोटीत न्यूझीलंडने टीम इंडियाचा 8 गडी राखून पराभव केला. न्यूझीलंडने मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
सामन्याच्या दुसऱ्या चेंडूवर जसप्रीत बुमराहने विकेट घेतली आणि पहिलं यश मिळवून दिलं होतं.
जसप्रीत बुमराहने न्यूझीलंडचा अनुभवी सलामीवीर टॉम लॅथमला बाद केला. यासह बुमराहची प्रतीक्षा संपुष्टात आली.
जसप्रीत बुमराहने कसोटीत कारकिर्दित पहिल्यांदाच टॉम लॅथमची विकेट घेतली. या विकेटसाठी बराच वेळ वाट पाहावी लागली.
जसप्रीत बुमराहने टॉम लॅथमला बाद करण्याासठी 141 चेंडू घेतले. लॅथमने बुमराह विरुद्ध कसोटीत 63 धावा केल्यात.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये बुमराहने टॉम लॅथमला दोन वेळा बाद केले आहे. या दरम्यान टॉमने 144 धावाही केल्यात.
टीम इंडियाचा पुढचा सामना न्यूझीलंडविरुद्ध 24 ऑक्टोबरला आहे. मालिका वाचवण्यासाठी विजय महत्त्वाचा आहे.