विजयी शतकांच्या शर्यतीत जो रुट सचिन-विराटच्या खुप पुढे
11 ऑक्टोबर 2024
Created By: राकेश ठाकुर
मुल्तान कसोटीत इंग्लंडने पाकिस्तानला एक डाव आणि 47 धावांनी पराभूत केलं.
पहिल्या डावात 500 धावा करूनही पराभवाचं तोंड पाहणारी पाकिस्तान पहिला संघ ठरला.
इंग्लंडच्या विजयात जो रूटचा भूमिका महत्त्वाची होती. त्याने 262 धावांची खेळी केली.
जो रूट शतकांच्या यादीत तिसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.रिकी पाँटिंग पहिल्या स्थानावर, तर सचिन खूपच मागे आहे.
इंग्लंडच्या विजयात वाटा असलेलं जो रूटचं हे 24 वं शतक आहे.
या यादीत रिकी पाँटिंग पहिल्या क्रमांकावर असून ऑस्ट्रेलियाच्या 30 विजयात वाटा आहे. तर स्टीव वॉच्या नावावर 25 अशी शतकं आहेत.
कसोटीत 51 शतकं ठोकणाऱ्या सचिनची 20 विजयी शतकं आहेत. तर विराट कोहलीच्या नावावर 13 शतकं आहेत.