केन विल्यमसनने शतक ठोकत केली विराट आणि डॉन ब्रॅडमनची बरोबरी

29 November 2023

Created By: Rakesh Thakur

बांगलादेश आणि न्यूझीलंड यांच्यात सुरु असलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या दिवशी केन विल्यमसनने शतक झळकावले.

केन विल्यमसनच्या कसोटी कारकिर्दीतील हे 29 वं शतक आहे.

शतकासह केन विल्यमसनने डॉन ब्रॅडमन आणि विराट कोहलीची बरोबरी केली.

कोहली आणि ब्रॅडमन यांच्या नावे कसोटीत प्रत्येकी 29 शतके आहेत.

केन विल्यमसनने गेल्या 5 डावांपैकी 4 डावात शतक झळकावले आहे.

दुखापतीनंतर केन विल्यमसन 8 महिन्यांनंतर कसोटी सामना खेळत आहे.

केन विल्यमसनने 29 नोव्हेंबर 2023 पर्यंत 6 सामन्यांच्या 10 डावात 656 धावा केल्या आहेत.