काव्या मारन यांना जबरदस्त फायदा ! आयपीएलमध्ये पराभवानंतरही कमावले 5200 कोटी

10  June 2024

Created By:  Rakesh Thakur

आयपीएल 2024 स्पर्धेच्या अंतिम फेरीत सनरायझर्स हैदराबादचा पराभव झाला. पण शेअर बाजारात कंपनीने चांगली कमाई केली आहे. 

सन टीव्ही नेटवर्कचे शेअर आयपीएल सुरु होण्यापूर्वी पडले होते. आयपीएल सुरु होताच या शेअर्सने उंची गाठली. 

29 डिसेंबर 2023 पर्यंत कंपनीचा शेअर 710.90 रुपये होता. मात्र त्यानंतर शेअर पडण्याची गती वाढली. 21 मार्च 2024 पर्यंत कंपनीचा शेअर 16 टक्क्यांनी पडला. 

22 मार्चला आयपीएल सुरु होताच शेअर्सला चांगले दिवस आले. आयपीएल, निवडणुका संपल्या असून कंपनीच्या शेअर्समध्ये 22 टक्क्यांनी वाढ झाली आहे. 

आयपीएल सुरु झाल्यापासून 80 दिवसांचा कालावधी लोटला आहे. 10 जूनला कंपनीचा शेअर 725.10 रुपयांपर्यंत पोहोचला. कंपनीच्या शेअरमध्ये 131 रुपयांची वाढ झाली. 

80 दिवसात कंपनीच्या मार्केट कॅपमध्ये चांगला वेग दिसला. कंपनीच्या शेअरमध्ये वाढ होताच कंपनीचं व्हॅल्यूएशनही वाढतं.

सन टीव्ही नेटवर्कची मार्केट कॅप 21 मार्चला 23,414.54 कोटी होती. 80 दिवसात म्हणजेच 10 जूनपर्यंत मार्केट कॅप 28,575.08 कोटी झाली आहे. 

सन टीव्ही नेटवर्कला 80 दिवसात 5160.54 कोटी रुपयांचा फायदा झाला. कंपनीच्या व्हॅल्यूएशनमध्ये चांगला फायदा झाला आहे.